Thursday 17 May 2012

deva bola ho majhyashi


                   देवा बोला हो माझ्याशी
 देवा, कोणया अेका कविने म्हटले अाहे की 
देव देवळात नाही, देव  नाही देव्हारी
देव चोरुन ने अशी असे कोणाची पुण्याई
माञ कलियुग अाले अाहे अाणि कोणा पाप्याची नजर देवळातील देवावर पडली अािण त्याने देव चोरुन नेले
देबळातील दागिने,चान्दीची भान्डी, चोरीला जाण्याचे तुरळक प्रकार घङत असत माञ अाता कोकणातील
दिवे अागारातील सुवर्ण गणेश मन्दीरातून दीड किलो बजनाची शुध्द सोन्याची मूर्ति चोरटयानी चोरुन नेली अाहे: मूर्ति सोन्याची की दगडाची हा प्रश्न भक्तापुढे कधीच नसतो ,अभक्ताकडे असतो ;दिवे अागारातील या गणेशमूर्तिचे बाजारमूल्य चोराना बरोबर माहीत होते

 ही गोश्ट तशी १५ वर्शापूर्वीची अाहे दिवे अागार हे तसे कोकणातील छोटेसे गाव,समुद्र किनारी वसलेले,शान्त,लोक खाअुन पिऊन सुखी होते,गावात मन्दिरे होती पण सोन्याची नव्हती ,एक दिवस गावातील दर्ौपदी बाई यान्ना माडाच्या वनात खणताना एक २ बाय २ फूट अाकाराची मोठी ताम्ब्याची पेटी सापडली, या पेटीत गणपतीची  सोन्याची सुबक मूर्ति होती,हीर्याचे दागिने होते, हो ऽऽ लवकरच सर्व  ठिकाणी बातमी पसरली, दिवे अागार  स्थळ पर्यटन स्थळ बनले 'खानावऴी, दुकाने हाँटेल या सर्वानी गाव गजबजले,गणपती बाप्पाची कृपा झाली।

अाज १५ वर्शानन्तर ही  मूर्ति चोरीला गेली ,चोर अजूनही सापडत नाही मूर्ति परत मिऴत नाही देवाची मूर्ति असुरक्शित ?सावधान, राञ वैर्याची अाहे,देव चोरीला गेला अाहे,

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव अाहे असे म्हणतात ना,मग देवा तुमचीच चोरी झाली ? तर अाम्ही अाता कोणाकङे बघायचे? देवा बोला हो माझ्याशी,
देवा बोला हो माझ्याशी,देवाऽऽऽऽऽ


शुभान्गी पासेबन्द

1 comment: