माझे स्तंभ
बहिणभावाच्या सुंदरनात्याचे वर्णन करणारी जी निवडक गाणी आहेत त्यात हे गाणे अव्वल नंबरवरला आहे. हरे राम! कृष्ण - द्रौपदीच्या त्या बहिणभावाच्या निर्मळ नात्याचे वर्णन या गाण्यात आहे. भाऊबीज हा तसा गरीब - श्रीमंत, श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वच व्यक्तिंच्या जीवनातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भावाने बहिणीची भेट घ्यावी. तिच्या घरी जेवण करावे. तिच्या कडून अोवाळून घ्यावे व खास भाऊबीजेची भेट द्यावी, असा रूढ संकेत आहे. या दिवशी पत्नीच्या हातचे जेवण घेतल्यास चांगले नसते असाही समज आहे. बहिण भावाच्या नात्याचा सन्मान करण्याचा हेतू भाऊबीजेच्या सणात असतो. दिवाळीच्या चार दिवसात भाऊबीज अहम् असते. हे दोघेजण एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले, एकाच घरात वाढलेले, बालपणी एकमेकाचे उष्टे खाऊन, भांडून गोड होणारे असे! मैत्रीचे, आंबट, गोड, कडू असे ते नाते असते! भाऊबीजेला बहिणीला भाऊ भेटीस आला नाही तर ती नाराज होते व चंद्राला अोवाळते. शब्दांच्या पलीकडे असे खास बहिणभावाचे नाते वरिल गाण्यात दिले आहे ---
अयोध्येचा राजा
चैत्र शुक्ल नवमी ही रामनवमी या नावानेच अोळखली जाते. या दिवशी दशरथपुत्र रघुकुल उत्पन्न प्रभु श्रीराम यांचा जन्म झाला. प्रभु श्रीराम यांची जन्मकुंडलीही अतिउत्कृष्ट अशीच होती. सर्वगुण संपन्न, एकपत्नीव्रत पाळणारे, जनता जनार्दनाचे त्राते असे प्रभु रामचंद्रांचे वर्णन केले जाते.
रामनामाच्या जपाने सर्व संकटे दूर पळतात. बुध कौशिक ऋषिंनी लिहिलेले श्रीराम रक्षा स्तोत्र सर्व संकटातून तारुन नेते.
घटका जाती, पळे जाती, काळ जातो ठणाणा।
आयुष्याचा ऱ्हास होतो, राम सारे म्हणाना।।
- अशी राम नामाची महती आहे.
सीतामाते सारखी पत्नी, लक्ष्मणा सारखा बंधु व वीर हनुमानासारखा शिष्य असलेल्या प्रभुरामाच्या चरणी लीन होण्यातील आनंद अमृत तुल्य आहे.
गीत रामायणातील "राम जन्मला ग सखी राम जन्मला" हा पाळणा लोकप्रिय आहे. जनमानसात प्रभु श्रीरामाबद्दल अोव्यांमध्ये, लोकगीतांमध्ये खुप ठिकाणी उल्लेख आहे. रामाचा पाळणा तर अजूनही म्हटला जातो. सीता स्वयंवराबद्दलचे आकर्षण जनमानसात खोलवर रुजलेले आहे. अजूनही कांही ठिकाणी लग्नपत्रिकेवर प्रभु श्रीराम व समोर वरमाला धरुन उभी असलेली सीता हेच चित्र छापलेले असते. विवाहाच्या चर्चेत प्रभु श्रीरामाचा उल्लेख असतो.
गौर वधु बरी, सावळ्या वराला
जानकी गोरी श्रीराम तो सावळा
किंवा
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
असा प्रभु श्रीरामाच्या सावळ्या रंगाचा उल्लेख आपण येतो.
श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे
सती अहिल्या दगडामाजी शापित होवून युगयुग माजी
प्रभु रामाच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन आले.
श्रीराम, श्रीराम या जपाने विलक्षण मानसिक समाधान मिळते.
उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली
उभी कलश दुधाचा कौशल्या माऊली
ही भुपाळी सकाळ प्रसन्न करते.
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी
राजा आला अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा
रामनाम किती आनंद देते बघा-
सहस्त्रनाम तत् तुल्य रामनाम वरानने
तरीही शेवटी लिहिते -
मंदिरातल्या मूर्तीतून का कधी राहतो राम? तुझ्या रे अंतरी त्याचे धाम।
---------------एक हजारोंमें मेरी बेहेना है।
शुभांगी पासेबंद
९८६९००४७१२
-- देवा बोला हो माझ्याशी
देवा, कोणया अेका कविने म्हटले अाहे की
देव देवळात नाही, देव नाही देव्हारी
देव चोरुन ने अशी असे कोणाची पुण्याई
माञ कलियुग अाले अाहे अाणि कोणा पाप्याची नजर देवळातील देवावर पडली अािण त्याने देव चोरुन नेले
देबळातील दागिने,चान्दीची भान्डी, चोरीला जाण्याचे तुरळक प्रकार घङत असत माञ अाता कोकणातील
दिवे अागारातील सुवर्ण गणेश मन्दीरातून दीड किलो बजनाची शुध्द सोन्याची मूर्ति चोरटयानी चोरुन नेली अाहे: मूर्ति सोन्याची की दगडाची हा प्रश्न भक्तापुढे कधीच नसतो ,अभक्ताकडे असतो ;दिवे अागारातील या गणेशमूर्तिचे बाजारमूल्य चोराना बरोबर माहीत होते
ही गोश्ट तशी १५ वर्शापूर्वीची अाहे दिवे अागार हे तसे कोकणातील छोटेसे गाव,समुद्र किनारी वसलेले,शान्त,लोक खाअुन पिऊन सुखी होते,गावात मन्दिरे होती पण सोन्याची नव्हती ,एक दिवस गावातील दर्ौपदी बाई यान्ना माडाच्या वनात खणताना एक २ बाय २ फूट अाकाराची मोठी ताम्ब्याची पेटी सापडली, या पेटीत गणपतीची सोन्याची सुबक मूर्ति होती,हीर्याचे दागिने होते, हो ऽऽ लवकरच सर्व ठिकाणी बातमी पसरली, दिवे अागार स्थळ पर्यटन स्थळ बनले 'खानावऴी, दुकाने हाँटेल या सर्वानी गाव गजबजले,गणपती बाप्पाची कृपा झाली।
अाज १५ वर्शानन्तर ही मूर्ति चोरीला गेली ,चोर अजूनही सापडत नाही मूर्ति परत मिऴत नाही देवाची मूर्ति असुरक्शित ?सावधान, राञ वैर्याची अाहे,देव चोरीला गेला अाहे,
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव अाहे असे म्हणतात ना,मग देवा तुमचीच चोरी झाली ? तर अाम्ही अाता कोणाकङे बघायचे? देवा बोला हो माझ्याशी,
देवा बोला हो माझ्याशी,देवाऽऽऽऽऽ
शुभान्गी पासेबन्द
i like u r writing so much. good going. best of luck for future
ReplyDeletethanks,my readers specially when i wrote Dian mehangai requested me to open a blog.
ReplyDeletebut i was not mentally prepared for
सोन्याचा दिन होवो
- शुभांगी पासेबंद
अक्षय दानाची तृतीया:
- अक्षय तृतीया हा सण तन, मन, धन या तिन्ही प्रमुख सुखांशी संदर्भित आहे. भौतिक परिमाण खरेदी (उत्सव) या व्यतिरिक्त सामाजिक (दान) आणि अध्यात्मिक (श्रध्दा) परिमाण या सणाला आहे. अक्षय तृतीये पासून त्रेता युग सुरु झाले म्हणून ही युगादी तिथी आहे. हिंदू पंचागानुसार जे साडेतीन सर्वोत्तम मुहूर्त आहेत. त्यातील हा एक शुभ मुहूर्त आहे.
स्थिर धन:- या दिवशी सुरु केलेल्या कार्याचा क्षय होत नाही व वस्तू कायम स्वरुपी घरात राहाते म्हणून खरेदीसाठी हा मुहूर्त गाठण्यासाठी धावपळ केली जाते. धन हे सुवर्ण मुद्रांमध्ये मोजले जाण्याची राज परंपरा असल्याने सोने खरेदी ही श्रेष्ठ गुंतवणूक मानली जाते. या दिवशी सोने खरेदीचा सुवर्ण योग व गृह खरेदीचा उत्तम योग असतो. त्यामूळे हिरे, सोने, चांदी खरेदीची मोठी उलाढाल होते. लक्ष्मी, कुबेर, विष्णू व सुदर्शन यंत्राची पूजा केली जाते. शेतकरी राजा शेतातील परणीची पूर्व तयारी म्हणून पशूधनाची पूजा करुन हल-खाता सुरु करतो.
निरोगी तन:- वैशाख वणव्याने पूर्ण पृथ्वी तापलेली असताना शरीर उन्हाच्या झळांनी शुष्क होते. म्हणूनच वसंतोत्सवाचे आयोजन करुन हळदी कुंकू, चंदन, पन्हे, आमरस, श्रीखंड, मातीच्या माठातील वाळ्याने सुगंधीत जल, सुवासिक सरबत याद्वारे शरीराला थंडावा देण्यासाठी स्नेहभोजने आयोजीत केली जातात. स्त्रिया चैत्र शुक्ल तृतीये पासून जी चैत्र गौर मांडतात तिचे उद्यापन या ितसऱ्या तीज ला केले जाते.
निर्मळ मन:- या दिवशी परशुराम जयंती असते. परशुरामाने समुद्र मागे हटवून वस्ती केली, अजुनही गोवा व कोकणाला परशुराम भूमी म्हणतात. गंगा नदीत अथवा तीर्थक्षेत्री स्नान करुन पितरांसाठी जप, तप, दान व पूण्य कर्म केले जाते. होम हवन व तर्पणाने त्यांच्या मुक्ती साठी प्रार्थना करतात.
अक्षय दान:- या दिवशी आहेरे असा सधन गट, नाहीरे अशा निर्धन गटाला अक्षय दान देतो. माणुसकीच्या जाणिवेने अतिरिक्त धन, धान्य, कपडे, दंभ अथवा अहंकार न दाखवता, सत्पात्री दान द्यावे. पोटभर जेवणाऱ्यांना जेवणावळी घालणे अपेक्षीत नसून, भूकेल्यांना अन्न द्यावे. तहानलेल्यांना पाणी द्यावे. खरा आनंद हा घेण्यापेक्षा देण्यात असतो. हे दान आपल्याला आशीर्वाद रूपात परत मिळते.
जल दान:- पाण्याचे महत्व पुर्वजांनी जाणले होते. या दिवशी दोन मातीचे माठ कापडाने झाकून सोबत हातपंखे, तूप, तांदूळ दान करतात. धनिक पाणपोया घालतात, जलाशये, विहीरी खोदतात. यथाशक्ती अशी सामाजिक बांधिलकी सर्वांकडून अपेक्षीत आहे.
आपण सामान्य जन पाणी वाचवून, पाणी साचवून, जल संधारण करून, जल दूषित न करण्याचा वसा घेऊ या. पुढील पिढीला खरेदीच्या सुवर्ण योगा बरोबरच सामाजिक जाणिवेची ही अक्षय तृतीया आनंदाची जावो.
नव्या विचारांनी हा दिन सोन्याचा होवो.
prepublished in loksatta
very good, keep writing,
Deletei am waiting for next post
This comment has been removed by the author.
ReplyDeleteshala suru zalya,colleges hi suru zali,
ReplyDeleteata pavsachya dhara suru hovu de, shtisathi tyachi garaj ahe