Wednesday 23 April 2014

रंगकेशरी


रंगकेशरी 

                                                           शुभांगी पासेबंद

त्या रंगकेशरी फळाच्या येण्याची चाहूल मला आज लागली. सकाळी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या आंव्याच्या झाडांचे शेंडे पिवळसर मोहोरांचे मुकूट घेवून सजलेले बघितले आणि मन मोहोरून गेले. दशँनमाञे मनकामना पुरती,अशा त्या आंब्याला फळांचा राजा म्हणतात. या फळराजाची प्रजा त्याच्यावर खूष असते.त्याला चाहते खूप आहेत.                           आला ग बाई, आंब्याचा ऋतू आला।
आतूर मी लोणचे, आमरस खायला।।
देवाचे आभार आंबा,दिला बक्षिस आम्हाला।
रंगकेशरी फळ नैवेद्य देईन तुम्हाला।।
आंब्याची तहान वर्षभर लागते. आंबा न मिळाल्याने आंब्याचे चाहते बेचैन होतात. असे एका जाहिरातीत दाखवले आहे. त्या आंबाप्रेमीसाठी फ्रूटी, मँगोला, आंबामावा, आंबाबर्फी, लोणची, स्लाईस, आंब्याचे पन्हे, आंबोशी,साखरआंबा या व आशा वस्तू वर्षभर मिळाव्या म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

मधयंतरी"आम आदमी" म्हणून, आम्हा जनतेबद्दल तुच्छतेने शब्द उच्चारले गेले तरी, त्यातील शब्दाचे,आमचे इंग्रजी भाषांतर 'Mango-people' झाल्यामुळे जनता खूष झाली. राजाच्या दरबारांचे नावही आम दरबार, खास दरबार असे असते. आंब्याला शुभ आणि पवित्र मानतात. कुंकवाची कुईरी, तबक अनेक दागिन्यांतील पदके व लटकन्, मुकूट या सर्वांना आंब्याचा आकार दिला जातो. शुभ प्रसंगी दरवाजावर आंब्याच्या डहाळ्या टांगल्या जातात. त्यात तत्त्व असे असते की, समंध (राक्षस) आला व त्याने विचारले, "मी कुठे बसू?" तर त्याला "आंब्याच्या डहाळीवर बस!" असे सांगितल्यावर तो आनंदाने त्या डहाळीवर बसतो. म्हणजे ती आंब्याची डहाळी त्या राक्षसालाही आवडते. सख्यांना अांब्याच्या झाडाला झोका बांधायला आवडते.शुभ कार्यात मंगलकलशात सुध्दा पाच आंब्याची पाने घालतात.

रंगकेशरी आंब्याचे कलमी, कापी, शेपट, हापूस, पायरी, तोतापूरी, बिट्ट्या, राजापूरी असे वेगवेगळे प्रकार असतात. आंव्याच्या आत एकच बीज असते, त्याला आपण कोय म्हणतो. काही ठिकाणी कोईला बाठा असेही म्हटले जाते. आंबा रोप वाटिकेला आमराई म्हणतात.आमार आई अामची आई असा त्याचा अर्थ काढता येईल.आमराईत कोकीळपक्षी गीत गाऊन वसंत ऋतूचा राग आळवतो, असे म्हणतात. अनेकविध पक्ष्यांचे आंब्यांचे झाड हे लाडके माहेरघर असते. बहरलेला डेरेदार वृक्ष बघून प्रत्येकालाच आनंद होतो. आंब्याची सावली घनदाट असते. आंब्याच्या झाडाखाली बसून पांथस्थाला आत्मशांती आणि शकून मिळतो. आंब्याला जे वाकडे टोक असते ते बघून पोपटालासुध्दा हेवा वाटला असावा, म्हणून कदाचित त्याला आंवा आवडत नसावा.

आंबा कापून खाणे,आंब्यावर सुरी चालवणे मला दुष्टपणाचेच वाटते.आंब्यासारख्या फळाला कापणे नको म्हणून आंबा चोखून खाणे मला आवडते. रसाने कपडे पण पिवळे केशरी होतात.नवे घेता येतात.फतकल मारुन, जमीनीवर बसून, दोन्ही हात बरबटून कपडे बरबटुन,आंबा मनसोक्त खाण्यातला आनंद वेगळाच असतो. आमरस चमच्याने खाणे म्हणजे त्यातला आनंद निम्मा करणे. तरीही आमरसपुरी हा उन्हाळ्यातला स्वर्गसुख देणारा लोकप्रिय मेनू असतो. श्रीखंडात आंबा टाकून आम्रखंड बनवल्यास, त्यातही आंबाच भाव खाऊन जातो. अांबापोळी नर कावळेच खावून जातात. जेवताना आंब्या शिवाय इतर गोड पदार्थ खाणे म्हणजे बघा काही जणांच्या , खाणाऱ्यांच्या बिघडलेल्या अभिरूचीचे द्योतक वाटल्यास नवल नाही. कुठल्याही आम्रभोजनाचा हेतू केवळ मन लावून आंबे खाणेच असतो.आमराईतील डोहाऴजेवण हा महीला वर्गाचा लोकप्रिय कार्यक्रम असतो. म्हणूनच म्हण आहे - "आमके आम गुठलियोंके दाम,"किंवा "आपको आम खानेसे मतलब है, की पेड गिननेसे?" 
आदिमानव कमरेभोवती आंब्याची पाने बांधत असे(संदर्भ ःटारझन,मोगली व.)
त्यानंतरच्या काळात आम्रभोजनाला सख्या जाताना म्हणतात (संदर्भः लोकगीत)
"चला ग सयांनो आंब्याच्या वनाला जाऊ या"
लोकनृत्यात पद अाहे,             या हो आंबेवनात नवरा कुणाचा येतो
 एक बालगीत आहे               आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो।
बिरबलाच्या कथेत राजाराणी खूप आंबे खातात कोयींचा ढिग जमतो असा उल्लेख आहे. 
एका लावणीत सुध्दा म्हटलय-    "पाडाला पिकलाय आंबा"
बालगीतात राजपक्षी मोराची नाचायची अांबेवन हीच जागा सांगतात-
"नाचरे मोरा आंब्याच्या वनात" 
आमराई बाळगणाऱ्यांना धोका असतो तो दगड मारुन आंबे पाडणाऱ्यांचा. त्यामुळे मोहोर लागल्या पासून पुढे चार महिने मालकाला आंब्याच्या झाडाभोवती खडा पहारा द्यावा लागतो. वात्रट बालके,वय विसरणारे तरुण कैऱ्या पळवतात, माकडे आंबे खाऊन जातात. आंब्याला कीड लागू शकते. त्यामुळे हे केशरी सुवर्णफळ हाती लागे पर्यंत मालकाची दमछाक होते. आंब्याला आत्ताशी कुठे मोहोर आला आहे. आंबे हाता तोंडाशी येईपर्यंत धीर धरायला हवा. आंबे तोडायचे झिले रिपेअर करून आणायला हवे. आंब्याचे झाडाचे आळे मोठे करुन पाणी द्यायला हवे. पुठ्याची खोकी, आंबे पिकत घालायला आणून ठेवायला हवी. गड्याकरवी राखण करायला हवी. 
आंबे पिकण्यासाठी जमिनीवर चाऱ्यामध्ये अढी घालणे आलेच. या फळांनी लगडलेल्या आंब्याचा हेवा भल्याभल्यांना वाटतो. अांबेबहरावर जऴून जऴुन आंब्याच्या झाडाच्या मालकाबद्दल इतर लोक अढी बाळगतात. सारे फल एक तरफ
आम भाई एक तरफ
असे आहे माझे आंब्याबद्दल स्पष्ट मत आहे. आंब्याच्या झाडाला फारसे डोलायची सवय नसते. तो एक धीरगंभीर पणे उभा राहणारा वृक्षच असतो. त्याच्या फांद्या फळांनी लगडल्या की त्या जमिनीजवळ झुकतात, जणू त्या आपल्याला बोलावतात आणि ही फळे स्विकारा, ही फळे खा अशी अॉफर देत असतात.या ऋतूत "सबकुछ आम" असेच मेनू असतात. या दिवसात पांढऱ्या खोबऱ्याच्या वड्या आमरस घालून पिवळ्या होतात. एरवी चिंचगूळ घालून चवदार बनणारी आमटी, कैरीच्या फोडींनी लज्जतदार बनते. आंबेडाळ व पन्हे हा मेनू प्रत्येक हळदी कुंकवाचा बनतो. भेळभत्त्यामध्ये आंबट कैरी येते आणि जेवणात कांदाकैरीची कोशिंबीर येते. ताटात, पोटात, अोठात आंब्याचेच आनंददायी पदार्थ खुलत असतात. देवाला प्रसाद आंब्याचा देतात, देवीच्या अोटीत सुध्दा आंबाच असतो. 
प्रत्येक व्यक्तीने कुंडीत का होईना एक तरी आंब्याचा वृक्ष जरूर लावावा. पर्यावरण रक्षण होईल.त्या आंब्याच्या लालसर कोवळ्या पानांपासून झाडाला रंग केशरी फळ लागे पर्यंत व पाड लागे पर्यंत निसर्गाचे सृजन रंग पाहायला हवे. त्यातला निर्मळ आनंद घ्यायला हवा. स्वत:च्या झाडाचे फळ आंबाबाईला (होय, इथेही आंबा आहेच आणि हो, रागीटबाईला आंबाबाई म्हणतात) वाहायला हवे. तो आनंद रसभरीत असतो.
आंब्याबद्दल असे रसभरीत, पिवळे धम्मक, रंगकेशरी वर्णन केल्यामुळे तोंडाला खुपच पाणी सुटले. त्या केशरी रंगाच्या फळाला स्मरून हे आंबा पुराण आवरते. आपल्या साताऱ्याची आंबाबर्फीची फोड (वडी) तोंडात घालते.देवबाप्पासुध्दा हे फळ बनवल्यावर खूष झाला.
खुदाभी आसमॉसे जब जमींपर देखता होगा
640px-Cocoa_Pods.JPG.jpg
आम्रफल को किसने बनाया सोचता होगा


फूलांच्या गावाला कधी जायचे?                 शुभांगी पासेबंद
देव सर्व सजीवांना वेगवेगळ्या प्रकारे अाशिर्वाद देत असतो,
फुले हे त्या असिर्वादांपैकी एक भावरुप असते
फुलांचे वेड नाही अशी व्यक्ति विरळाच असते फुलांच्या मंद सुगांधाने प्रत्येकाचेच मन भरुन जाते. काट्या कुटयांनी भरलेली वाट सुगंधीत करण्याची , नजरेला निर्मऴ आनंद देण्याची कला या  फुलांना ऊपजतच माहित आहे,फुलांच्या सोबतित मन डोलते,सुखावते ,प्रसन्न होते

उद़यानांमध्ये मशागत करुन विविध रुपी, विविध रंगी फुले फुलवलि जातात,मात्र अशी मशागत न करता केवाळ निसर्गराजाचे देणे म्हणुन ुमलणार्या फुलांचे कास पठार,जगातील अदभुत आश्चर्य आहे.अशी हजारोंच्या संख्येनेफूले उमलतात.कुठल्या परदेशात नाही,महाराष्ट्रातच हो! आपल्या महाराट्रातच,सातार्याला,कास पठारावर हि फुलांची दुनिया आहे.अगदी गुरु दत्तने जर ही फुलांची दुनिया, बघितली असति ना,तर त्यंाची काय बिशाद होति की म्हणावे
=ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है
विश्वातील खास असा दर्जा , या कास पठाराला मिळाला अाहे।पश्चिम घाट तर वैश्विक बनलाच आहे,कासचे पठार तर त्या घाट रुपी मुकुटाच्या कोंदणातिल हिराच आहे.
'व्हॅलि अॉ्फ फ्लॉवर्स' सारखे आकर्षक नाव नसले तरी,फुलोंकी घाटी सारखे वलय नसले तरी, 'पुष्प पठार' अशी मराठमोळी उपाधी धारण करणारे ते फुलांचे सुंदर गालिचे अॉगस्ट -सप्टेंबर महीन्यात बहरतात,खरेतर,पथ्थर शब्दांवरुन पठार शब्द आला आहे.त्या पथ्थरावर फुललेल्या फुलांवरुनच 'फूल अौर पथ्थर, चित्रपट सुचला असावा असे मला दर वर्षी
वाटते.

पहिल्या पावसाची सुखद सर येताच ही फुले उमलायला सुरुवात होते.हऴु हऴु ही फुले तुमच्या स्वागतासाठी मोठी रांगोऴी घालतात काही एकरंगी, काही दोन रंगी,काही धुपछाव असलेली, म्हणजे,अर्धी ़फिकी, आर्धी गडद रंगाची असतात.रानफुलांच्या या परडीत  मिकीमाउसच्या आकाराची,कपबशा ,कंदिल,पिंजरे,तुतरि अशा आकाराची ,रंगीत,लाल, जांभळी,रंगकेशरी फुले फुलतात,छोटया टिकली पासुन,ते मुठीएवढी अशी,लोंबत्या वेणीच्या आकाराची,बटणासारखी,अशी विविधता आढळते. अलाउद्दिनच्या गुहेसारखी अजब दुनिया दिसते. कास म्हणजे परमेश्वराची जणु प्रयोगशाळाच आहे.देव अजब गारुडी, वेगवेगळे प्रयोग करतो, प्रयोग बिघडतो,वेगवेगळी फूले चुकुन बनतात, काही हटके, मुद्दाम नवनवी घडवतो

ही जादुई दुनिया सातार्यापासुन जेमतेम २० किमि अंतरावर आहे,छौटी फुले वार्यापुढे टिकाव धरुन राहतात, या शास्त्रीय तत्वानुसार, फुले फार मोठ्या आकाराची नसतात.
फुला रे फुला तुला वास कोणि दिला?
फुला रे फुला तुझा रंग कसा अोला?
फुलांची ही दुनिया ,अनोखी , न्यारी दुनिया बघायला,कासला पहाटे जावे.

फुलांना स्वसंरक्षणार्थ काटे असताता, त्यामुऴे, मळलेल्या पायवाटेनेच जावे, बूट घालुन जावे.निळे ईटुकले डोंगर, पांढरी लाला कमऴे फुललेले तळै,लाल पाण्याचे ओहोळ,हिरवी शेते,फुलांचे पांघरुण गुन्डाळलेली सुस्त पृथ्वी,तिला उठवायला आलेले बंडखोर सुर्यनारायण,लाल सोनेरि प्रकाश, निसर्गप्रेमींसाठी लई भारी चित्र असते,लुटा किती सोने लुटायचे तितके! आणि खूष व्हा।
विल्यम वर्दस्वर्थ या लेखकाला, डॅफोडिल्स ही कविता, फुले बघुनच सुचली,आमच्या कासच्या पठारावर,ते लेखक आले असते ना तर त्यांनी खंडकाव्यच लिहीले असते.
कासच्यापठारावर, तुम्हि जणू वनराणी/वनराजा बनून जाता,सोनेरी प्रकाश, राज्याभिषेक करतो.तुम्हीपण त्या डॅफोडिल कवितेत लिहिल्याप्रमाणे नंतर डोळै मिटुन बसाल तेव्हा तुमच्या नजरेसमोर खास कासचे पठार येइल.तेरड्याचा रंग तीन दिवस तशी ही फुले अल्पायुषी असतात,त्यामुळे त्या ठराविक काळातच उमलतात
सातार्याजवळ पसर्णीच्या घाटात धनुरधारी सीतामातेची मुर्ती आहे.यापठारांवर शीतामाता एकट्याच वावरल्या, तयामुळे, येथे त्यांचे अश्रु पडले असा समज जनमानसात आहे। त्यामुळे लहान, बुंदक्यासारख्या आकाराच्या फुलाना सीतेचे अश्रु म्हणतात,पांधर्या फुलांना सीतेचे पोहे म्हणतात.लांब लोंबत्या एका फुलाला सीतामातेची वेणी असे नाव दिले गेले आहे.अजिंक्यतार्यावर सुद्दा अशी फुले आढळतात
पाउस पडला की मला जणु त्या पुष्पपठाराचा ,माहेरचा ,सांगावा येतो
फुलेच फुले फुललीत ग लेकी
पठारावर जायला ये चटदिशी
घेउन ये सख्या सवंगड्यांना
मान दे फुलांच्या आमंञणाला
फुले पुलली आहेत,कासच्या पठारावर कधी जायचे?
फुलांची दुनिया बोलावते आहे
फुलांच्या गावाला कधी जायचे? 

640px-Cocoa_Pods.JPG.jpgकरुलचा मधुसंचय
मधू मंगेश कर्णीक यांचया करुळचा मुलगा या ात्माचरिञाचे परित्राचे परिक्शान  ानेक जणांनि लिहिले
१९५१ सालि त्यांचा कषणाचि राधा हा  ह्या कथेपासुन सुरु ङालेला साहित्या प्रावास ाज या पुस्ताका पर्यंत पोचला ाहे
६० वर्षे काळजाला हात घालनारे लिखान  त्यांनि केले, कोकणि ग वस्ति,सुर्याफुल, माहिमचि खादि,पांघरुण, रुद्रा निळा पक्स्हि

तयानचहया लिखानाला कोनकान चया मातिचा सुवाास येतो, तयानचे लिखान ासेच वरचेवर वाचायला मिलो हि सदिच्छा
कारुलचा मुलगा ाता मधु संचय रिकामा करतो ाहे
   

No comments:

Post a Comment