Wednesday 3 April 2013

वेगळे लिहायचेय मला वर्ष नवे हर्ष नवे

तेच ते नको,काहीतरी वेगळे
वेगळे लिहायचेय मला


श्रीरामाच्या बाणासारखे,
शबरीच्या बोरांसारखे,
चिञगुप्ताचे बाड चोपडे
जणू सह्याद्रीचे उंच कडे
बालिकेच्च्या पैंजणासारखे
वेगळे लिहायचेय मला

बाळाच्या जावळासारखे
अोलसर अोठांसारखे
जणु हवा महालातील अारसे
गोधुलीच्या वेळचे कवडसे
जणू  गांधीजींचे चरखे
असे सत्य लिहायचेय मला

नववर्षाच्या शुभेच्छा
पूर्ण होवोत माझ्या इच्छा
ठेवा पाठीशी माझ्या
तुमच्या सदिच्छा

april is declared as amonth of poetry , so do write
apreciate, critisize, or otherwise,
but please write,
In new year plan to publish book on prepublished columns,see u then
                               वर्ष नवे हर्ष नवे(पूर्व प्रसिद्धी लोकसत्ता ११=४=२०१३)
चैत्रि प्रतिपदेला बोली भाषेत पाडवा असे म्हणतात.हिंदुंचे नववर्ष या दिवसापासून सुरु होते . या दिवशी कुलाचाराप्रमाणे तैलाभ्यंग करुन घरासमोर मंगल गुढी उभॉरुन तिची षोडषोपचारे पूजा करतात, नववर्षाच्या पंचांगावरिल गणपतिचे पूजन करु संवत्सर फलादेश वाचतात आणि कुटुंबासह गावच्या शोभा यात्रेत सामील होतात.धर्मशास्त्रानुसार प्रभु श्रीरामांनी वालीचा नाश करुन प्रजेला संकटमुक्त केले,यानिमित्त हा आनंद ,ऊत्सव असतो. हा दिवस साडे तिन मुहुर्तातिल एक असल्याने या दिवशी सोने ,चांदी,वस्त्र ,घर ,वाहन अशी खरेदी केली जाते,जी पाडव्याच्या सणाला संस्मरणीय़ अशी रेशमी सोनेरी किनार लावते.
गुढीच्या ध्वजाचा रंग रेशमी अोला
शकुनाच्या पाऊल खुणा घेवुन अाला
सोन्याच्या दर्यात चांदीची नाणी
नवबर्षाचा अाला उष;काल राणी
या दिवशी कडुनिंबाची कडु पाने साखरेसोबत प्रसाद म्हणुन खातात.कदाचित जीवनात सुख दु;ख सोबत येणार असा तत्वज्ञानाचा संदेश पूर्वजांनी यांतुन दिला असावा, जणु जीवन जगण्याची कला च त्यांनी शिकवली शिवाय कडुनिंब अारोग्याला हितकर असतो. नवीन वर्षाची सुरवात कटु प्रसादाने केल्याने पुढिल कटु प्रसंगाना तोंड देण्याची संघर्षाची पूर्वतयारी होत असेल. आज समाजासमोर अनेक परीक्षा बघणार्या कटु  सत्यांना सामोरे जावे लागते आहे. जसे : सामाजिक प्रश्न ,बेकारी ,प्रदूषण ,जागतिकमंदी ,असुरक्षितता दुष्काळ वाढती महागाई लोकसंख्या, अपुरे स्रोत,ज्यावर ठोस उपाय होणे आवश्यक आहे,जे प्रश्न तोंडाची चव घालवतात.पण तरीही नववर्षाला आनंदाने कवेत घ्यायचे,अानंदाची पताका लावायची.
आपले सर्वच सण क्रुिष संस्क्रुतीशी जोडले गेले आहेत.' शेतात पीक पिकावे मोत्याची कणसे वार्यावर डोलावीत,रोजचा दिवस गोड व्हावा' ही सदिच्छा आणि प्रार्थना पाडव्याला देखील केली जाते. पाडवा या सणाला वसंत ऋुतु मधीलप्रत्येक गोष्टीतूनहजारो हातांनी देव नजराना  बहाल करतो. कोवळीपालवी फुले पाने,अांबे,पक्ष्यांचीशीळ मंद उष्ण वारा कोकिळेचे कूजन हा निसर्गाचा आशिर्वाद असतो.  हे   जीवन सुंदर असते,प्रत्येक नवे वर्ष,नवा दिवस,नवीन क्षण ही निसर्गाने दिलेली भेट असते. नव्या अनुभूति नवे रंग यांची३६५ दिवसांच्या या भेटीबद्दल अभिनंदनकटु ,वाईट काळ निघून जाईल,जसे जुने वर्ष गेले तसा मंदीचा, दुष्काळाचा,वाईट काळ सुद्धा जाईल. नव्या वर्षात गुढीला बांधलेल्या गोड गाठीत ती आाशा असते  पंचांग कर्ते जरी या संवत्सराला विक्रम संवत म्हणतात. पण येणार्या संवत्सराला आपण निर्भया संवत्सर म्हणु शकतो. आशेने संघर्षाची तयारी करु शकतो,थबकायचे पण नवी ऊमेद घेवुन पुढे जायचे.
मी सर्वांना नववर्ष निर्भयतेने जगण्यासाठी शुभेच्छा देते. परंपरेच्या अक्षय वृक्षाला फुटलेली नवी पालवी अशीच बहरु दे,नवीन वर्ष अानंदाचे जाईल, याआशेने आपण नववर्षाचे स्वागत करु या.
अखंड परंपरा आपली मराठमोळी शान,
वसंत ऋुतुचे स्वागत करु या गुढी उभारुन छान.
दारि उभारता गुढी घर हसले नाचले,
वर्ष नवे हर्ष नवे सामोरे अाले.

rubroo roshni........................................
Aye Saala
Abhi Abhi Huaa Yaqeen Ki Aag Hai Mujh Mein Kahi
Hui Subaah Main Jal Gaya
Suraj Ko Main Nigal Gaya
Ruu-Ba-Ruu Roshni Heyy... (2)

Jo Gumshuda-Sa Khwaab Tha
Woh Mil Gaya Woh Khil Gaya
Uulon Hathaa Pighal Gaya
Kichhaa Kichhaa Machal Gaya
Sitaar Mein Badal Gaya
Ruu-Ba-Ruu Roshni Heyy... (2)

( Dhuaan Chhataa Khula Gagan Mera
Nayi Dagar Naya Safar Mera
Jo Ban Sake Tu Hamsafar Mera
Nazar Mila Zara )... (2)

Aandhiyon Se Jaghad Rahi Hai Lau Meri
Ab Mashaalon Si Bhad Rahi Hai Lau Meri
Naamo Nishaan Rahe Na Rahe
Ye Kaaravaan Rahe Na Rahe
Ujaale Mein Pee Gaya
Roshan Huaa Jee Gaya
Kyon Sehte Rahe
Ruu-Ba-Ruu Roshni Heyy... (2)
Dhuaan Chhataa Khula Gagan Mera
Nayi Dagar Naya Safar Mera
Jo Ban Sake Tu Hamsafar Mera
Nazar Mila Zara
Ruu-Ba-Ruu Roshni Heyy... (2)
Aye Saala... (3

No comments:

Post a Comment