Thursday 28 June 2012

पाऊस आला

पाऊस अाला

पाऊस खुळा                 शुभांगी पासेबंद
एका अोल्या संध्याकाळी ,अाभाळ भरुन अाले.एक पावसाचा थेंब कपाळावर टपकन छान पडला़मी वर आकाशाकडे बघितले.कदाचित रोजच्या धकाधकीच्या, गोन्धळाच्या, काळात,तू मान वर करुन त्या परमेश्वराकडे बघ,असेच तो पाऊसमित्र मला सांगत असावा.मन गुणगुणु लागले
पाऊस पहीला जणु सानुला
बरसुन गेला ,बरसुन गेला,
पानावरती मयुर पिसारे जणु फुलती,
लहान मुले नाचु लागतात,
येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा
दारासमोर वाहणार्या पाण्याच्या अोहोळांमघ्ये कागदी  नावा बनवुन सोडतात,पावसात भिजतात,गरम भजी खात,पावसाचे ते नर्तन दाद देत बघतात.थेंबबावरी नक्षी बघत स्वप्न रचतात
पाऊस सगळ्यांचाच लाडका,कलाकारांचा अावडता असतो.
लोकगीतांमध्ये पावसाचे तरल वर्णन अाहे,जसे
मेघरायाचे लगीन,अाभाळ वाजवी डफ
वीजबाई करवली अाली झपझप
धरित्री ग सये अाला तुझा पति अाला
अाला वघा अाला,पावसाळा आला,
पावसाळा असाच येतो,उत्सवी सण,हळवे मन घेऊन,तारकांचे आकाश हाताने वाजुला करुन,डोंगरदरीचे नाते सोडुन, हट्टीपणे कोसळतो.तो गरीब,श्रीमंत, शेतकरी, कामकरी,शहरी, ग्रामीण असा भेदभाव करीतच नाही. सर्वंावर सारखाच जमके कोसळून पडतो.चिखलतळे साचवणारा पाऊस चांगला, की किसलेल्या चीजसारखा भुरुभुरु रिमझिमणारा चांगला?या इथे शहरात पडणारा चांगला की तिथे डोंगरदर्यात बरसणारा चांगला?या लोनली प्लँनेटवर पाऊस किती टक्के लोकांना अावडतो याची पाहणी व्हायलाच हवी,कुणीतरी करायला हवी.कधी खूपखूप आवडणारा पाऊस फसवा असु शकतो,कघी न आवडणारा सुखावुन जातो.काहीजणांना तर।वातानुकुलित गाड्यांत आणि सिमेंटच्या जंगलात,अभेद्य भिंतीत,नवीन ऋतु अाला हे लवकर कळतच नाही,पण शेतकरीदादा या पावसाची आतुरतेने वाट पाहतो,बारोमास बघतो.अपमान झाला की मग रागावुन तो गाभडीचा, खुळा पाऊस बेधुंद बरसतो,हैरान करतो.पाऊस म्हणजे लहरी खटले अाहे.
अभंग व लावणीने एकत्र यावे तसे ऊन पाऊस एकत्र सुद्धा येतात.पाऊस कघी लोकलगाड्या बंद पाडतो,तर कधी दडी मारुन बसतो व भाव खातो,अापली किंमत जाणवुन देतो पावसाचा हट्टीपणा आणि पावसाचे अाकर्षण,पाऊसप्रेम, हा खेळ जुनाच आहे,पाऊस खुळा तो कायमच खेळतो.
समुद्र बिलोरी आयना, प्रुथ्वीला पाचवा महीना(श्रावण)
अशी ती वसुंथरा बहरते, हिरवी अोढणी घेऊन शेत गर्भार होते,मोर पिसारा फुलवतो,बेडुक डिस्को राग,डराव डराव आळवतो,पक्षी लगीनघाईत असतात,हिरवी माया अाभाळभर पसरते,एका छञीत भिजायचे दिवस येतात,नाहितर ज्यांचे गेलेले असतात त्यांना ते हळवे करुन खूप रडवत आठवतात,परतुन यावेसे वाटतात.इंद्रधनुष्याची कमान जिन्यासारखी वापरुन म्हणे स्वर्गातुन अप्सरा,गंधर्व,देव भूलोकी येतात,पाऊस म्हणजे एक आनंदपर्व असते.नवलऋतु असतो
पाऊस खुळा किती पाऊस खुळा
कोसळुन अंगावर हसवी फुला
कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलिची नक्षी अंबरात.
मान्सुन दाखल झालाय
मग कसा वाटला पहिला पाऊस?
पाऊस म्हणजे शेतकर्याचा प्रिय मिञ
पाऊस म्हणजे कलाकाराचे हळवे प्रेमपञ
पाऊस म्हणजे जीवनाचे अोले आमंञण 
पाऊस म्हणजे प्रियेचे अबोल आलींगन
पाऊस खुळा अावडतो ना?त्या पाऊसमित्रालाच हा अोला हिरवा इंद्रघनुष्यी सलाम,
scpaseband@gmail.com

Monday 11 June 2012

Ajantha,Elora and Archeology and me

Visited Ajantha, Elora,

We had planned Shirdi and Shani Shingnapur but, perhaps, God recognised my hiden desire to take admission in Archeology and we could visit Ajantha and Elora instead

Today i atended "blogers park" a play by newcomer artists.
There was some problem in microphone but theme was good,Best of luck to those struglers

I am busy with Ajintha study
schollar ?
13/6/2012,
co travellers at Ajintha 

Monday 4 June 2012

rahu de gharte novel

*rahu de gharte* is novel 128 pages,
i had a CD prepared for it but  to post it as an e book I can not find it,
hence .....
shubhangi

I have been more busy than before,
I used to think that 24 hours of a day are less for work,
then came the retired leisure period,
and now again busy days
rest days r boring but can not help
preparing for next book Rang keshari
on 14/2/2013 in Gavkari Amba moharla maza lkh ahe, vacha
bless me that i get well soon and blossom comes in my life also



so many unfulfilled dreams r there,to write blog to publish books, to go for Europe tour, to sit at Pyramids in Egypt

i need my readers,\' well wishes to have a fast recovery

Saturday 2 June 2012

मुंबई विद्यापीठातून creative writing course केला

mumbai university  creative writing workshop
Kalina mumbai ,पण अाहे पुणा युनि ची,
अजुन शिकते अाहे
,still strugler in literature world

 दादा म्हणाले तसा learning L board is with me
पंख है कोमल अास है धुंदली
जाना है सागरपार
sometimes I think success is a chance?

मुंबई विद्यापीठ मला हा आत्मविश्वास देऊन गेली कि हो मी blog लिहू शकते।

 नाहीतरी लिहीत असायचे, काहीबाही कच्चे पिकलेले
अाता तरी हे काय नवीन अाहे ,नाही फारसे बदललेले
माझे हे लेख जणु शंख शिंपले , अथांग वाळुत विखुरलेले
असेन मी, नसेन मी या किनारी ,उरतील मागे शब्द अोले
शुभांगी


शुभांगी