Sunday 10 March 2019

कृष्णराव काका

'कृतार्थ जन्म जाहला ' कृष्णराव शेट्ये
 
                                                                                                          शब्दांकन:शुभांगी पासेबंद

आपल्या महाराष्ट्रातील एक हुषार व्यक्तिमतव ,डॉ. कृ.आ. शेट्ये ,नागपुर यांचेबद्दल मी आज लिहिणार आहे.
श्री कृष्णराव शेट्ये काकांचे जीवन,सर्व तरुणांना प्रेरणादायी ठरावे असे आहे. शेटये काकांचा,एक आई विना अनाथ मुलगा ,ते अनाथांचा मार्गदर्शक,पिएच डी चे गाईड हा प्रवास,अशी त्यांची वाटचाल छान  आहे. कृष्णराव काकांची,वलगाव,जि.अमरावती येथे वास्तवात असतांना,जन्मानंतर केवळ १ वर्षाने आई वारली. केवळ कॉंलरा तापामुळे त्या काळी मृत्यु होई.,तो आघात कुटुंबावर झाला.त्या काळी, लसीकरण मोहीम नव्हती. त्या काळी अनेक आजारांवर उपचार होत नसत. त्यामुळे शेट्ये काकांचे, आईला वाचवता आले नाही. "आई वारली तेव्हा,मृत आईच्या देहाशी मी ,बालक,वय वर्ष एक,दुध पीत होतो.रडत होतो"असे कृष्णराव काका सांगतात. काकांची आजी या बाळाला(काकांना) बघत असे पण, वडिलांना सोनारकी व्यवसायातून वेळ मिळेना." असे काका सांगतात.पूर्वी घरी ,आई असतांना,वडिलांचा  व्यवसाय छान चालत असे, पण व्यवसाय चालेंना. वडिलांना व्यसन नव्हते,पण वडिलांनी पुनर्विवाह केला नाही,पण वडिलांचे कामातून लक्ष उडाले.
यापुढे काकांची गोष्ट,मी त्यांचेच शब्दात सांगते.
*******
शेट्ये काकांची गोष्ट
१ खामगाव
खामगावला राहणार्या मुलाशी, माझ्या बहिणीचे लग्न झाले होते. या मोठ्या बहिणीकडे ६ व्या वर्षी, मी राहायला गेलो. मला बहिणीने शाळेत पहिली ईयत्तेत घातले. मात्र मेव्हणे माझ्यावर चिडचिड करीत. मला  कायम कामाला लावत असत. ते दौती टाक वापरायचे दिवस होते. पुढे मी ३ री ईयत्तेत आलो. त्यापूर्वी पाटी पेन्सिल वापरली जाई. मला मेव्हणे रागवत. कधी कधी मारहाण करत. तिथे बहिणीचे दरवर्षी बाळंतपण असे,दरवर्षी मुले होत असत.जी पाळणे,पोसणे अवघड होते.मी म्हणजे जणू मेव्हण्यांना, घरकामाला गडी व बटन काज करायला ,शिंपी कामाला गडी मिळाला होता. मी शिकावे अशी त्यां मेव्हणयांची,मनापासून ची ईच्छा नव्हती.तरी ई८ वी पर्यंत मी तिथे कसातरी राहिलो, मेव्हण्या कडून होणारा ,कामाचा ,अन्य छळ वाढत होता.ई ८ वी पास झाल्यावर ,मला तो छळ सोसेना. मी घरातून भुसावळला पळून गेलो.मी  घराबाहेर पडलो ते ,या इराद्याने की मुंबईला जायचे नशीब काढायचे.
२ भुसावळ
भुसावळला मी रेलवे platform वर निजलो. साधी अर्धी चड्डी,सदरा,थंडीत पाय पोटाशी घेवून निजुन जाई.मी तिथे ८ दिवस फुटाणे खात,भटकत जगत राहिलो.एके दिवशी एकटेच नोकरीचे शोधात निघालो.एका किराणा दुकानात ,मी नोकरी मागत गेलो. त्या वाणी मालकाकडे ५ रुपये पगारावर कामावर राहिलो. तिथे शेण गोठ्याचेही काम असे. किराणा दुकानात सामान भरणे, लावणे, जळगाव हून घावूक किराणा आणणे,किरकोळ विक्री करणे, असे काम असे.मी आणि अन्य एक वयस्कर नोकर ,असे दोघेजण कामगार होते. आम्ही दोघे मिळून ,ते काम करीत असू. सकाळी दुकानात सामान भरणे, रात्री घरच्यांचे अंथरूण घालणे. सकाळी गादया उचलणे ,आवरणे,ही कामे देखील असत. दुकान मालक २ भाऊ होते.मोठ्यावर किराणा दुकानाची जबाबदारी असे .ते पतीपत्नी चांगले होते. जेवण खाणे देत ,भरपूर नाही ,तरी पुरेसे अन्न देत. त्यांनी कधी उपाशी ठेवले नाही. रात्री त्याघरी मोठ्या वाहिनींशी मी गप्पा मारीत असे. मोठा भाऊ times of india  वाचत असे.मी देखील कधी कधि वाचून बघी.
पुढे मी किराणा दुकान कामासोबत लेले मास्तरांकडे,दारोदार पेपर वाटण्याचे काम केले.ईतराना पेपर वाटतांना ,मी पण वाचनाची आवड असल्यामुळे, दुकानात वेळ मिळताच, वाचत असे. मला वाचतांना बघून, मग या थोरल्या भावाने माझी चौकशी केली. मी सर्व काही खरे सांगितले. तया वेळी वडिलांना माझ्या आईचे मृत्यूने ,विरक्ती आली होती. मी ८ वी पास होतो,शाळेपर्यंत माझे उत्तम रेकॉर्ड होते. माझ्या हायस्कूलच्या सरांनी ,मालकांना सांगितले होते, याला चांगल्या शाळेत शिकवा. वडील तेव्हा वारले. ते निर्व्यसनी साधे भोळे होते. या सर्वात माझे १ वर्ष वाया गेले. माझ्याकडून कुणीही ढोर मेहनत करून घेत असे. त्यां घरी सर्वानी तर ,सर्व कामे करुन घेतली,पण मला पण शिकवले.पुढच्या वर्षी थोरल्या मालकाने ,माझी शाळेची फी भरली. शाळेत अॅडमिशन करवली.मला डी.एस. हायस्कूलं भुसावळ ,या उत्तम अशा म्युन्सिपाल्टी शाळेत दाखला घेतला दिला. शिक्षक छान होते.भूगोल national geography refer  करून चांगला ,मनापासून शिकवत.
नारखेडे गुरुजी मराठी अल्जेब्रा शिकवत. सरांना ,काव्य कलेचे अंतरंग, या पुस्तकाबद्दल बक्षीस मिळाले होते. या काळी अरुण वाचन या आचार्य अत्रे संपादित पुस्तकाचे वाचन मी केले. एक 'स्त्री'शीर्षकाची  कविता होती,विनायकांची, मला ते शालेय शिक्षण आवडले. तेथे ई८वित संस्कृत विषय वर्गाला शिकायला आला.
3 तीन.
मी ई ९वित गेलो. मी University subject घेतले. कारण non university subjectने अन्य गावी, अन्य शाळेचे ठिकाणी दाखला,प्रवेश घेता येत नसे. मला त्या वर्षी पास होण्यापुरते मार्क्स  मिळाले. या किराणा वाणी कुटुंबातील,मोठ्या भावाचा ,धाकटा मुलगा, मला असे वाटते कि माझा विनाकारण मत्सर करीत असे. भुसावळच्या या नोकरीतील भांडणांनी कंटाळून ,शेटजीनी,माझी पुस्तके काढून घेऊन, मला घराबाहेर काढले.माझे ई ९ विचे ९ महिने झाले होते. मी मित्रांकडे काही दिवस ,वार लावल्यासारखे जेवण करून ,दिवस काढले. पण असे किती दिवस चालणार होते. या डी.एस हायस्कूलच्या ,लेले मास्तराकडे मी गेलो.मी त्यांना सारे सत्य सांगितले.
" वाटेल ते काम करीन मला कामावर ठेवा,शिकवा"असे  सांगितले.
आज पासून खानावळीत राहा सर म्हणाले.लेले सरांच्या खाणावळीतील एक काकू मला म्हणाल्या, "ईथे राहा, वाढण्याचे काम कर, किरकोळ काम  ,घरगुती खानावळीत ,लॉजमध्ये मला तुझी मदत होईल.कारण माझे भाऊ स्वयंपाक करतात.ईतर मदत तू कर.
जेवण वाढणे साडे दहा ते साडे अकरा असे. शाळेची वेळ साडे अकरा असे. मी काम करुन ,पळत पळत शाळेत जाई. मला शिक्षणाला ,फ्रीशिप लेले सरांनी, मिळवून दिली. ईयत्ता नववी झाली. परीक्षेत चांगले चांगले मार्क्स मिळाले.
4 दहावीचे वर्ष होते.
एकदा लेले मास्तरांच्या कडे Times Of India  चे agent आले होते. ते म्हणाले, मला कामाला  मदतगार हवाय. पेपर टाक, अभ्यासावर थोडा परिणाम होणार,पण पैसे मिळतील.”
पेपर वाटणी पहाटे करुन,दिवसभर अभ्यास करुन,मी ई१० वी चे वर्ष पूर्ण केले.ते वर्ष व म्याट्रिकचेही काही महीने,अर्ध वर्ष, मी ते काम केले .खानावळीतील कामे ,मात्र दही विरजण्या पासून सर्व कामे करावी लागत असत.शेजारी, बाजूच्या मावशी सुद्धा माझ्याकडे विरजण मागत असत,ईतकी कामे असत. मला लेले सरांना ,सरबतसुद्धा,पेलयात  अोतून द्यावी लागे, पण सरांना विश्वास होता, हा दारु पिणार नाही. त्याचवेळी, १९५० च्या दरम्यान ,आदरणीय श्री ह.रा.महाजनिंनी ,दै लोकसत्ता वर्तमानपत्र सुरु केले. मराठी पेपर चांगलं असल्याने, विकत घेणारे, वाचक झपाटयाने वाढले. पेपर विक्रीला दुसरा मुलगा मिळेपर्यंत तू लोकसत्ताचे देखील काम करशील का?असे एका गृहस्थांनि विचारले.मी होकार दिला.
मी ५.३० वा. भुसावळ स्टेशन वरून, TOI व लोकसत्ता आणून, ८.३० पर्यंत गावात ,वाचकांचे घरी वाटत असे. सकाळी ८।३० चे पुढे खानावळीची तयारी चाले, दुपारी शाळा असे.
4 काम तर करायचेच.
आता झाडपूस अशी कामे नसत व विनाकारण त्रास देणारे कुणी नव्हते. संपादकांना ऑक्टोबर मध्ये परीक्षा जवळ आल्यावर, लेले सरांनी सांगितले, तो पेपर वाटणार नाही, अभ्यास करणार आहे. मला मग स्वतंत्र खोली, वीज घेऊन,लेले सरांनी मला अभ्यासाला दिली. त्यावेळी दिढे नावाचा नापास झालेला मुलगा मला सोबतीला भेटला. त्याकाळी पुरवणी परीक्षा नसत. वर्षातून एकदाच परीक्षा होई. ATKT नसे. परीक्षांचे ३०% निकाल लागत. इंग्रजीचे बाबत ,मला लेले मास्तर गाईड करीत. मी TOI वाचत असे. ज्यामुळे माझे इंग्रजी ,खूप सुधारले. जनरल इंग्लिश, synonym ,unseen passage  तयारी असे.मी लवकरच मान्सून सुरु होण्याची वाट बघू लागलो. पावसाच्या दणदणीत सरी शेतात येतील.माझे वय तसे पावसाची वाट बघायचे होते.
5 अभ्यास
निसर्ग हा माणसांपेक्षा झाडा पक्ष्यांचा असतो. माणूस उपराच, देवराई खरी असते. उघडे कातळ, बोडके डोंगर, निसर्गाची पडझड दाखवतात. पिसारा पसरून पाऊस झेलणारा मोर समोर उभं असलेली मोरांची चिंचोली आठवे. मोर डोंगरी आठवते. मिडल स्कूल मध्ये तर्खडकर इंग्रजी सुरु झाले. कुटमुटिया matric magazine मी सोडवी. Phrases  पाठ करून तयारी करी.परीक्षेत १० मार्क्सचे प्रश्न त्यावर येत. मुंबईहून निघणारे matric magazine होते. अभ्यास चांगला झाला. Arithmetic ई१०वित संपले. Algebra geometry हे विषय ११वी पर्यंत होते.
मुंबई बोर्डा तर्फे प्रिलीम होई. जणू अॅन्युअलच होती. मला Algebra त गती मिळाली. मला ९२/१०० मार्क मिळाले. खूप हुशार मुले तिथे होती. मला स्पर्धा देणारा एक   J JOSHI पुत्र होता. आता तो डॉक्टर आहे. मला म्याट्रिकला एस एस सी ला मराठी काव्हीट ,५५ हून अधिक मार्क मिळाले.हिस्ट्री अल्जेब्रा विषयात DISTINctION मिळाले. संस्कृतचे बाबत १ वर्ष अभ्यास कमी पडल्याने ,मला त्यात गती नव्हती. पण पास झालो. पण इतिहास व मराठी बाबत, छान स्टाईल मी डेव्हलप केली होती. म्याट्रिक पास झालो.
मग सुरु झाला पाउस काळ,मी पर्जन्यसुक्त मय झालो.
वाहू लागले नदी वाहाळ,गवयाचे रंगले गाणे
जणू मंदिरातले दीप उजळणे,आले पावसाचे फुटाणे   
खूष झाले बियाणे ,आले पाऊसगाणे
पारिजातकाची फुले ,ज्या दोराने ओवतो त्या दोऱ्याला सुगन्ध व रंग लागतो. तसेच पावसाचे असते. आतून शांत, बाहेरून अशांत, संवाद साधणारा, एरवी आवाज ऐकू न येणारा, मनात घालमेल करणारा पाऊस व पावसाची शांतता तुम्हाला आवडते का?असे माझ्या मनातलेच भाचे  सूनबाई शुभांगीने शब्दांकन करतांना विचारले. ते खरे होते
6 गुजराथ
३ सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केलेल्या गुजराथ आनंद मधील युनिव्हरसिटीत ,मी डिप्लोमा सिव्हील इंजिनियरिंग ला अॅडमिशन घेतली. Polytechnic  मधील एका परिचिताने ,मला ती अडमिशन करवली. पण मला तिथले applied maths जमेना. मी डिप्लोमा २/३ महिन्यात सोडला. Huminity, arts subject मला जमतील, म्हणून मी असा निर्णय घेतला कि नागपूरला जायचे.  कारण चुलत भाऊ ,नागपूरला नोकरी करत होता. चुलत भाऊ विवाहित होता. घरी चुलत वाहिनी होती. भाऊ दवाखान्यात compounder होता. पण मला बुड टेकायला जागा मिळाली असती. विकास सुरु झाला,अमरावती शहराची रचना,अरथ सथिती बदलली.वडिलांचे, वलगावच्या, सुपीक साडेतीन एकर जमिनीचे, भरोशावर व्याजाचा धंदा करायला ,मारवाडी आले. त्या गावातलया जमिनी ,मारवाडी मागत दारावर आले. मेहुण्यांनी जमीन विक्री व्यवहार केला. अमरावतीला फिल्म एक्सचेंज कंपन्या होत्या. उदा. राठी व त्यांच्या तर्फे चांगली किंमत ,जमिनीला सांगून आली. मेहुण्यांनी वडिलांची जागा विकली.ते पैसे बॅंकेत व्याजावर ठेवले व दरमहा मला ३०/३५ रुपये पाठवू लागले.
नागपूर
7 नागपूरला महालात सिटी कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतले. सरदार भोसलेंचे ,सरदार मनभट उपाध्याय यांच्या, ३ मजली इमारतीत,मी  खोली भाड्याने घेतली. पूर्वी अशा हवेल्याना ,३रया मजल्यावर ,अंधारा खलबत खाना असे. १० रुपये भाड्याने हि खोली ,मला गं.भा.आत्यानी राहायला मला दिली. पाणी विहिरीतून खालून आणावे लागे. संडास खाली होते. मेहुण्याकडून येणारे माझेच पैसे, वेळचे वेळी येत. वाडा प्रशस्त होता.कॉलेज पासून जवळ होता.घरी आल्यावर पायजमा शर्ट धुणे. अंघोळ करणे, हि कामे असत. माझ्या University subjects मुळे admission पक्की झाली.घालायला मला २/३ पायजमे होते.पण खानावळ परवडत नव्हती. घरी कणिक विकतची आणून, तुरडाळ आणून, मी स्वयंपाक करी. भूशाच्या शेगड्या ,त्यावेळी मिळत असत. त्या मांडून ,मी पोळ्या थापून करी. तेल अगदी थोडे आणि. दांडा असलेला ,तवा वापरी.भाजी पैसे जमले तर हॉटेल तून तयार आणायची. पण ३० रुपये परवडेना, थोडीशी ,महागाई वाढली. Sky high price  तेव्हा नव्हत्या. जागेचया किंमती तर आता वाढल्यात. वरचा मजला असा silent zone होता. गोंधळ नसे. त्यामुळे मित्र देखील, वर माझे खोलीत यायला घाबरत असत. अशा तर्हेने अभ्यास सुरु झाला. B.A. degree 1st year was best year होते. History, political science, marathi, english economics होते. History favorite होते. मी या पहिल्या वर्षाला साने गुरुजी, ना सी फडके यांच्या धर्तीवर, छोटी वाक्ये ,साधी वाक्ये लिहायला सुरुवात केली.
साने गुरुजींचे शब्दांचा मी भक्त होतो. शामच्या आई पुस्तकाची मी पारायणे केली. विनोबा अन्य पुस्तकाची देखील पारायणे केली. मनावर या लेखकामची थोड्या फार प्रमाणात छाप पडल्याने मी ती style copy केली. Economics मी intermediate harol lasky  चे पुस्तके आयव्होर जेनिग्जचे पुस्तक वाचले.books वाचून मी फडशा पाडत असे. Grammar of politics, parliamentary govt. in great Briton या books ची पारायणे केली. American democracy वाचले, प्रभावित झालो.
भाग 2
6/
Intermediate चे वर्ष आले ,college life सुरु झाले.
डॉ.आंबेडकरांचा प्रभाव ,वाचनाची आवड,इतिहासाची ,वाचनालयातील विविध विषयांची, त्या काळाची, सिटी कॉलेजची ,सर्व पुस्तके मी वाचली. इतिहासाचे सिनियर शिक्षक ,पहाडे यांचा प्रभाव पडला. त्यांची मर्जी माझ्या वर बसली.माझे  मराठी माध्यम होते. माझे मराठी चांगले होतोच, पण ते इंग्रजी शिकवत असत,त्यांच्याशी बोलण्या एवढी ,माझी ईँग्रजी लिहिण्याची गती होती. मी पास होवून इंटरमेदियेट परीक्षेत ,तिसर्या वर्षाला आलो. तो पर्यंत मी इतिहासाची चांगली पुस्तके वाचली. जे सी अबोट चे नेपोलीयनचे सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लंड वाचले. बोस्वेल चे सम्युअल जोन्सन चरित्र वाह्कॅले. स्टोरी ऑफ .........बाय व्यान लेन वाचले फ्रेंच रीव्होलूषण ची पुस्तके वाचली. लॉर्ड अक्शन ........on modern history. वाचली. Political philosophy edmand breake अकबर चरित्र count chare dr. ishwari medivel history वाचली. सरकार यांची पुस्तके (बंगाली इतिहासकार ) वाचली.शिवाजी अंँड हिज लाइफस्टाईल,लिखाण वाचले.
सरकारांनी छत्रपती शिवाजी यांचे विचार व्यक्तिमत्व परखडपणे मांडले आहे. आजचे आपले जीवन ही छ.शिवाजीं महाराजांची देणगी आहे, शिवाजी महाराज ही पिढ्यान पिढ्या स्फूर्ती प्रेरणा देणारी व्यक्ती होय.हजारो वर्षातून ताठ मानेने जागा असा संदेश देणारी छ,शिवाजी महाराज यांच्या सारखी एखादीच व्यक्ती जन्म घेते.महाराजांबद्दलची Desiging own administration ,revene system ,military Systemया तीन विषयांवर ची असंख्य पुस्तके आजही उपलब्ध आहेत.छत्रपती शिवाजी राजेंकडे,राज्यात सगळी कडे सर्व धर्म सहिष्णुता होती. महाराजांनी ,सुरतेला लूट केली ती श्रीमंतांची केली. गरिबांना छळले नाही. त्या काळी इंग्रजांच्या वखारी होत्या. महाराजानी दर्गा चर्च कुराण यांचा आदर केला. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार केला नाही. स्त्री विषयक अत्याचार करणार्यांना रायगडचे टकमक टोकावरून, कडेलोट करीत अथवा पाटलांचे तोडले तसे हात पाय तोडले. किल्ले बांधणीचे शास्त्रच वेगळे होते. बाबा साहेब पुरांदर्यानी छ.शिवाजी महाराज यांच्या बद्दल छान पुस्तके लिहिली आहेत.
जर शिवाजी महाराज नसते तर परकीय देशांच्या सीमा ,भारतीय उपखंडात कुठपर्यत गेली असती सांगता येत नाही.
समाजावर विचार लादण्या पेक्षा विचारांना प्रतिनिधित्व द्यावे, असा विचार मांडणारी पुस्तके मी त्या काळात वाचली. माझ्या तीन हि आवडत्या विषयात मी प्रावीण्यात आलो. हीरालाल जैन बक्षीस मला, विजया लक्ष्मी पंडितांच्या हस्ते मिळाले. इतिहास विषय माझा खास विषय झाला.
9 नवे वर्ष
कॉलेजचे ४ थ्या वर्षी,परीक्शांत वर्ष कसे तरी गेले.मी  बीए पास झालो.पुढे नोकरी शोधावीच लागली. त्या काळी नोकर्या मिळणे अवघड नव्हते.
नोकरी लागली ती ,पान्दुर्ण ,मध्य प्रदेश मध्ये सागली.दूर  होते., पण तिथे मी गेलो. माझा मित्र प्रभाकर चाफेकर यांनी त्यांचे खोलीवर माझी सोय केली. माझे लग्न झाले होते. पान्दुर्ण्याला मी पत्नीला बोलावून घेतले. पगार ओके होता. मुख्याध्यापकांची मर्जी होती. भूगोलाचे काम दिले. मी ते हि काम करू लागलो.
मी becamous of economical statistis साठी अर्ज केला होता. Cso central statistical organisation तर्फे सरकारी नोकरीचा कॅाल आला. ते पोस्टिंग शेगावला झाले. ३ महिने पगार मिळाला नव्हता. शेगावला समाजातल्या एका दहीवडकर नावाच्या व्यक्तीचे ,स्टेशन जवळचे घरात भाड्याने राहू लागलो. परिचित काकांनी त्यांचे वरील गोपालदास मोहरा खटल्यात मदत केली होती. १/२ वर्षे तिथे काढली. आम्हाला statistic asstt. म्हणून नोकरी होती. ह्या नोकरीत मी दिवस काढले. पगार फार खास नव्हता. महिना खर्च निघत असे. सीईओ तर्फे बदलीचे सत्र त्यावेळी सुरु झाले. विदर्भातच शेगावहून हिंगणघाटला आलो. शेगावला रेंटचेच घरात राहिलो. रेंट कंट्रोल एक्ट मुळे पाणी प्रश्न, अस्वच्छ toilet यामुळे सुंदर सजवलेले घर असूनही ४/५ वर्षे जेमते काढू शकलो. टोटल हिंगणघाटात १० वर्षे काढली. पुढे समुद्रपूर हिंगणघाट हून १० मैलावर तिथे बदली झाली. घरून जा ये करीत असे, कारण ते गाव खेडेगाव होते. मधल्या कळत परत बदली झाली.
10 नोकरीत बदल
मला बिडीओ म्हणून power official financial asistant चे काम मिळाले. हायब्रीड ज्वारीचे कम्पेनचे काम आले. ते शेतकर्यांच्या मध्ये करून मी लोकप्रिय ज्वारी चे नाव केले. पेरणी insecticide बियाणे खत पुरवठा,सर्व काम मी पार पार पाडले. Collector देखील खुश झाले.मी मनमिॆळाऊ होतो, सीईओ व हाताखालचेहि खुश राहत असत. FinaNce manpower सारे मी जमवले. प. जवाहरलाला नेहरूंचा तो चांगलं कार्यक्रम होता. दोन्ही बिडीओ जे सहकारी होते ,त्यांनी मला एम ए पार्ट १ व २ ला परवानगी दिली. व मी हि दोन्ही वर्षे पार पाडली.
मी जेव्हा घर सोडून पळून आलो होतो तेव्हा रेल्वे platform वर भुसावळला कुणी ओळखू नये म्हणून मी किसन नाव सांगितले होते. मला तिथे  ,स्टेशनवर ,मेहुणे शोधायला आले होते ,पण नाव वेगळे सांगितले असल्याने , कुणीही शोधले तरीही माझा शोध लागला नाही. मी सापडलो नाही कारण नाव वेगळे होते आणि त्या ठरविक कळकळीने कुणीही शोधले नाही. मी सापडलो नाही. बेंचवर ८ दिवस झोपलो. अंगावर चादर पांघरायला नव्हती,स्वेटर नव्हते. थंडी पडे. कसातरी राहीलो. सुदैवाने शरीराला अभावाची सवय झाल्यामुळे ,मी आजारी पडलो नाही.माझा आजदेखील आहार अल्प आहे. जे असेल ते खायचे ,पण तब्बेत कधीच बिघडली नाही. माझे कपड्याचे चोचले नव्हते. भुसावळच्या वाण्याकडे,पुढे मारवाड्याचे घरच्या स्त्रिया, माहेरी देखील मुल साभालायला मला नेत असत. सर्व कामे करून घेत असत, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्षच होई. शिवाय मलाही अभ्यासाचा टेम्पो येत नसे. पण जेवण खाण ठीकठाक मिले.निदान मला बहीणीकडे, मेव्हणे मारायचे तशी शारीरिक हिंसा, मारहाण ईथे नसे. पडेल ते काम मी केले . लेले मास्तरांच्या ओळखीचे,गृहस्थ, गण गालीकारांकडे नागपूरला रीफर केले. भुसावळला लेले मास्तरांकडे दिवस काढले. तसे मी यांचेकडे राहीलो  नाही पण लक्ष ठेवणे, देखरेख ख्गंगालीकरांनी केली.
11 कुटुंब
या काळात वडील बहिणीकडे राहात होते,ते टायफाईडने वारले.बहीण गरीब होती, तिच्याकडेही १ मुलगा खायला जडच होता. टेलर दुकानाची कमाई अशी काय असणारं? त्यामुळे मेव्हणे मारत असत,मी सोसले,पण  सहन होईना.त्रास चालवून घेत होतो,पण शिक्षणाची ओढ मला बोलावत होती.
नोकरी
रामटेकला राहून अध्यापनात मी कौशल्य कमावले. इंग्रजीत कुठलाही विषय शिकवण्याची कला मला आंदन मिळाली. रातेक्चा तलाव ,टेकडी ,मेघदूताची जागा ,१० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सारे शिकवणे मला खूप आवडे.
12 नोकर्या
बीएड च्या फिया खूप होत्या त्यामुळे ते जमले नाही. बीए झाल्यावर पहिलीच नोकरी रामटेकला शिक्षक म्हणून समर्थ विद्यालयात leave vacancy त मिळाली. पण पगार खास नसे. वेळेवर मिळत नसे. मग पांदुर्याला शिक्षक म्हणून काम केले. मुंबईला training statistical assistant म्हणून मुलाखात दिली तेव्हा माझे लग्न झाले होते. पण पत्नी मला परवडत नसल्याने अजून मात्र माहेरी राहत होती. १० वर्षे पैकी ५ वर्षे शेगाव, ५ वर्षे हिंगण घाटला नोकरी केली. अभ्यासाची आवड ,म्हणूण एम ए केले. जेव्हा नोकरी सोडून दिली ती फक्त बदलीच्या भीतीने,तेव्हा माझ्याकडे घरदार नव्हते ,मला दुसरी नोकरी हाती नव्हती.
हिंगणघाटला खाजगी कॅालेज मध्ये नोकरी पकडली. ६/ ६ महिने पगार मिळत नसे.  हिंगणघाट,तसे गाव लहान होते,त्यामुळे उधारीवर किराणा वगेरे मिळे ,सर्व चाले. उधारीचे घेतलेले सर्व पैसे मात्र मी फेडत असे. घरभाडे मात्र मी थकित न ऑेवता वेळेवर भरत असे.
एमए नंतर कॉलेजमधली नोकरीमुळे, पीएचडी ची मला खूप आस लागली, नागपूर विद्यापीठा तर्फे हिंगणघाटला असतांना पीएचडी साठी अर्ज केला.डॅाक्टरेट,गुरखा रेजिमेंट आर्मी ची नेपाळ कलकत्ता येथील कामगिरी या विषयात केली. मला पीएचडी झाल्यावर युनिव्हर्सिटीत नोकरी लागली. १९७७ ला परत १६ वर्षे हिंगणघाटला काढून ,मी पत्नीसह नागपूरला आलो.
13 माझे कुटुंब
माझे १९५७ साली लग्न झाले. १९६० साली शिरीष (मी शेगाव येथे असतांना) १९६५ साली वर्षा (हिंगणघाट येथे असतांना) जन्मले ,जन्म धुल्याला माझे सासुरवाडीला झाला. माझी मुले सुविद्य आहेत.पत्नीचे भाऊ,कै
नाना मामा सोनार औरंगाबादला होते. म्हणून,पत्नीची आई औरंगाबादला होती. तिथे शिरीषचा जन्म  झाला.
रामटेक मध्ये अन्य दोन शाळा होत्या. तो परीसर मला बोलावू लागल्या. रामटेक निसर्ग रम्य होते. १ वर्ष तिथे काढले पण पुढे,खूप करमेना. भग्न मूर्ती अना देशपांडे कवी अनिलांचे काव्य असलेली विष्णू व लक्ष्मीची मूर्ती रामटेकला आहे. कवी अनिलांची
आज अचानक गाठ पडे,
असता मन भलतीकडे.
भलत्या वेळी भलत्या मेळी
आज अचानक गाठ पडे.मला तिथे ऊमगली. कुमार गंधर्वांनी गायलेली गीत तिथे मला आठवे. तरुणपणीचे धडाडीचे दिवस होते,शिक्शण बोलावत होते.
भाग 3
आज अचानक गाठ पडे
कोवळी सकाळ मन मोकळी, हे गाणे अाठवायचे वय झाले. कवी अनील यांचे कविता मला आवडत,त्यांची पत्नी देखील लेखिका होती. मोत्याचा कंठा, कुसुमावती देशपांडेची कथा प्रसिद्ध आहे.
तिथून मी नोकरी शोधत नागपूरला जायचे ठरले. नागपूरला महालात शाळेत, लिव्ह व्हेकन्सीत मी आलो. दुसरी नोकरी महाल नागपूरची झाली.प्रा.काटे नावाचे इंस्तृमेंतचे शिक्षकांचे प्रोजेक्ट मधे लिखाणावर ,ते लिहित असत. You must get first class  ,मला काटे सर म्हणाले, या प्रेरणेने मी अधिक काम करावे असे मी ठरवले. त्यांच्या गुरुतुल्य प्रेरणेने मी अधिक घडलो. इतिहास प्राध्यापक पोलिटिकल सायन्सचे प्राध्यापकांनी देखील अस उत्तरं असे संदर्भ ठेवता म्हणून माझी स्तुत्ती केली.
मला सरकारी नोकरी देखील लागली होती,पण तिथे मला देखील ,काहींना लागलेली ,ती विचित्र किड लागेल,वाईट लागण होईल कि काय हि भीती वाटू लागे.पुढे कारवाई व्हावी इतका भ्रष्टाचार वाढला. बिडीओ चे काम मला नकोसे वाटू लागले.
शाळे पासूनच प्राध्यापक होणे, हि माझी महत्वाकांक्षा होती. माझे ते मिशन होते. मला खाजगी कॉलेज मध्ये बोलावणे आले,मला नोकरी मिळाली ती हिंगणघाट कॉलेजला! नियमित सरकारी नोकरी सोडून, मी तिथे प्राध्यापक झालो. दहा वर्षे मी तिथे आवडीने काढली.
पुढे मला पीएचडी करावी अशी तिवर आस वाटली. डॉ.बी.के. आपटे यांना, मी मला पीएचडीला गाईड करा ,अशी विनंती केली. पुण्याचे वातावरणात शिकलेले आपटे सरांनी सांगितले.वेगळा विषय देतो आहे तू तो संशोधनाला घे, मेहनत करावी लागेल, तो विषय चांगला आहे” गुरखा रेजिमेंट इन ब्रिटीश इंडिया चालेल का?
मी होकार दिला. ४/५ वर्षे मी अभ्यास केला. दिल्ली archives कलकत्ता ला संदर्भ तपासले.(national liberay) १९७६ साली माझी पीएचडी झाली.या प्रबंधात मी नेपाळ archive मध्ये भेटी देऊन लिखाण केले.
14 करियर
१९७६ साली ३ एक्झामीनर  होते. १ परीक्शकाने तो प्रबंध अप्रूव्ह केला, २र्याने रिजेक्ट, ३र्याने पास केला. प्रबंध कृपेने मी डॉ. शेट्ये झालो. विद्यापीठात १९७७ ला रिकामी जागा झाली. मी विद्यापीठात नोकरीला आलो. १९७७ नागपूर विद्यापीठात आलो. डीन माझे परिचित होते. स्पर्धा खूप होती. सिलेक्शन कमिटी ने लोकल माणसाना घ्यावे ,अशी शिफारस केली गेली होती.
१९७७ साली मी नागपूरला आलो. No break in service  असा शेरा होता.सुरुवातीला मी भाड्याची घरे घेतली.प्रथम  माधव नगर मध्ये,त्यानंतर teachers colony amaravati रोड ला भरतनगर समोर भाड्याचे घर होते. तिथे नंतर quarter  मिळाले. मधुकर अष्टीकराना विनंती केली कि माझी गरज आहे. त्यांनी शब्द दिला,Quarter रिकामे होताच देतो. ते शब्दाला जागले. Quarter allot order निघाली. सेवानिवृत्ती पर्यंत मी या घरी राहायलो. Quarter होते पण छान होते. माझ्या पत्नीने ते छान सजवले.
भाग ३
पीएचडी गाईड registration
१९७८ साली गाईड म्हणून मला रजिस्ट्रेशन मिळाले. २५ विद्यार्थी पी एच डी करत,त्यांना मी विविध विषय देऊन पीएचडी ला गाईड मार्गदर्शन केले. आज या माझ्या विद्यार्थ्यांना एकेक लाखावर पगार आहे. त्या वेळीही व आताही पीएचडी चे गाईड विद्यार्थ्याकडून सामान्यपणे फी घेतात. त्याकाळी मी विद्यार्थ्याकडे पैसे मागितले नाही. गिफ्ट्स देखील क्वचित स्वीकारल्या. मला समाधान आहे की मी २५ विद्यार्थ्यांना पीएचडी मिळवून दिली. विद्यार्थ्यांचे करियर बनले.
सेवनिव्रुती नंतर विद्यापीठातील, १७ वर्ष्याच्या नोकरीचे पेन्शन मिळाले. नंतर ते सर्व लिंक अप केले व ३३ वर्षाची माझी पूर्ण नोकरी जोडली गेली. पेन्शन मिळाली. मी आता सेवानिवृत्त आहे.
प्रवासाची आवड
मिना प्रभू यांची पर्यटन विषयीची पुस्तके वाचून मी प्रभावित झालो. आम्ही सहकुटुंब खूप प्रवास, दरवर्षी सहल करायचो. अरुणाचल, केरळ, आसाम, शिलॉंग, चेरापुंजी, चारीधाम, राजस्थान, गुजराथ, या भारतातील सर्व ठिकाणी मी पर्यटन ,आनंद प्रवास केला. पंचमढी व चिखलदरा झाले लाडके आहेत. शुभांगी पासेबंद हिचे कुठे शोधिसी रामेश्वर अन हे प्रवास वर्णन मला प्रिय आहे. बोर धरण, पेंच ,वरोरा आनंदवन या जवळपासच्या सहली मी वारंवार करतो. वायोमानाने किंचित अपंगत्व आले आहे. पण यशस्वी सेवानिवृत्ती नंतरचे सहजीवन चालू आहे. हिंगणे घाटला मी माहेर समजतो. मूळ गाव समजतो. हिंगणेघाट माहेर, नागपूर सासर आहे.
16 वाचन
आता वाचनच वाचन
म.गांधींवरची, रामचंद्र गुहांची पुस्तके.
India after M.K.Gandhi
India before M.K.Gandhi
India with  M.K.Gandhi
तीन खंड वाचतो
Rise of fall औफ हिटलर वरची, रुबेला थापर, इरफान हबीब,वर्तमानपत्रे ,लोकसत्ता ,सर्व वाचनीय पुस्तके मी वाचतो.Amartya sen,etc,ची लिखीते देखील वाचतो.
वाचनाचा आनंद घेतो.पत्नीची ऊत्तम साथ मला कायम मिळाली.दोन्ही मुले लाडकी होती,चांगली शिकली,आज ऊत्तम नोकरी करीत आहेत.
हे शब्दांकन करणारी शुभांगी पासेबंद ,माझ्या मेहुणीची सून आहे.नुकतेच माझ्या जेष्ट नातवाचे लग्न झाले असून,सारे जण सुस्थितीत आहेत.दीर्घ आयुष्य देवाचे कृपेने मिळाले,ते मी सत्कारणी लावले.आज 10मार्च माझा वाढदिवस,असे व्यक्त होण्याला अजून कोणता मुहुर्त हवा?
कृतार्थ जन्म जाहला,फिटून जाई पारणे.
लाभले नसे कुणा असे सुदैव भोगले.
*****--
डाॅ शेट्ये
शब्दांकन
शुभांगी पासेबंद
scpaseband @gmail.com
9869004712