Tuesday, 5 July 2016

श्रावणधारा

hi
friends
१५/९/२०१७
श्रावणधारा म्हणता म्हणता,
आता घामाच्या धारा लागल्या आहेत।
हे पर्यावरणातील बदल
त्रासदायक ठरत आहेत.
कार्बन फूटप्रिन्ट कमी करण्यासाठी ,लोकसंख्या नियंत्रण ,नवीन बांधकामे कमी करणे आवश्यक आहे
बघू सरकार काय पावले ऊचलते


श्रावणधारा
श्रावण आला कि वाटते हसरा नाचरा, थोडासा लाजरा श्रावण आला.
त्या चीज किसून टाकावे ,तशा पांढऱ्या रेशमी पाऊसधारा ,हळूहळू पृथ्वीवर पडून, पृथ्वीला गुदगुल्या करतात. आषाढ ,श्रावण ,भाद्रपद हे ३ महिने, हे पावसाचे महिने असतात. पृथ्वी सुंदर दिसते. माणसांची माने हिरवी होतात. ज्याला त्याला प्रेमाचे दिवस आठवतात. प्रेम करावेसे वाटते.
बालके आईला म्हणतात
“ए आई मला पावसात जावू दे
एकदाच मला चिंब भिजुन येवू दे”
कागदी नावा अोहोळांत सोडतात
“वो कागजकी  कश्ती, वो बारिश का पानी.”
जुनी नवी भावगीते आठवतात.
"रिमझिम झरती रेशीमधारा धरतीच्या कलशात.
प्रियाविण उदास वाटे रात.”
या गीतात प्रेम हि आहे आणि व्यक्ती बद्दलची आसक्ती आहे,विरह आहे.
"सावन के झुले पडे, तुम चले आओ "
म्हणत प्रेयसी पावसाळ्यात, घराच्या खिडकीशी बसून ,खिडकीच्या गजांना धरून, बाहेरचा पाऊस बघत प्रियकराला अंतःप्रेरणेने संदेश देते. प्रियकर कदाचित मनात थरथरत असेल, पण तो येत नाही.या गीतातील परिस्थितीत प्रेम आहे पण व्यक्ती नाही.किटक,खेकडे, बेडूक, किडे, गांडूळ, पक्षी,मानव, मोर, सर्वांचाच श्रावण हा आनंदाचा महिना असतो.
“सावन का महिना, पवन करे शोर
जियारा रे झुमे ऐसे ,जैसे बनमा नाचे मोर”
किंवा
“रिमझिमके तराने लेके आई बरसात,
याद आये किसीसे वो पहली मुलाकात”

विरहिणी गाते " अब के बरस सावन में, आग लागेगी बदन में, घटा बरसेगी मगर मिल ना सकेंगे दो मन” व्यक्ती आहे पण प्रेम संपलेले आहे. अगदी एक दुजे के लिये मधील वासू म्हणतो तसे, “प्रेम कहां चला गया?”
पावसाच्या खूप आठवणी असतात. बालपणी कागदी नावा सोडल्याच्या, तरुणपणी एका छत्रीत भिजल्याच्या, आडोशाला चोरून स्पर्श केल्याच्या पावसाळ्याच्या सहलीच्या.
आयुष्याच्या अल्बम मध्ये
आठवणींचे फोटो असतात
आणखी कॉपीस काढायला
निगेटिव्ह मात्र शिल्लक नसतात.
कहा चले गाये? ती दिवाणी प्रेयसी मात्र प्रियकराची वाट बघते. तो पुढे निघून गेला असला तरीही अरे हाय हाय ये मजबुरी. तिला वाटते आपण फसलो कि त्याने फसवले?
ये मौसम और ये दुरी
मुझे पल पल ये ताडपेये
'तेरी दो टकियेकी नोकरी में ,मेरा लाखोंका सावन जाये,”
सासुरवाशिणी म्हणते,
“अबके बरस भेज बाबूल को मइया,
सावनमे लेले बुलाय”
श्रावण हा पक्वान्नांचा मनभावन श्रावण सुद्धा असतो.
हल्ली गल्ली बोळात फास्ट फूड पार्लर्स असतात. आईस्क्रीम, बिस्किटे चॉकोलेट व मिठाईची दुकाने असतात. मात्र पूर्वी ह्या श्रावणात जे गोडधोड केलं जाई, त्या गोडधोड पदार्थांची वाट बघितली जाई. अजूनही काही बंदे ,ह्या अंधार उजेडाचा कशीदा काढलेल्या दिवसांची खाणे पिणे यासाठी वाट बघतात.
सर्वजणच या ना त्या कारणाने,आनंदाने श्रावणाची वाट बघत असतात. पावसाळ्यातील पारंपरिक पदार्थ त्यांच्यासारखी चव आजीलाच जमते. घरातील फुलांच्या परिमलात, मिसळल्या गेलेल्या पक्वान्नांचा सुवास आयुष्यभर आठवतो.
वा काय मजा असे. श्रवणधारा रिमझिमत असतात. श्रावणरंगी कुंद हवेत ,घरी आई ‘पावसात भिजू नको ग बेटा’ सांगत असते ,पण बसस्टॉप वर ,कॉलेज मध्ये पावसाळ्यात नाही रेंगाळायचे तर कधी? त्यामुळे पावसाळा बसस्टॉप वर रेंगाळून, मैत्रिणी शोधण्याचा सुद्धा असतो. मनाची हुरहूर सैराट झालेली असते.

वृद्ध व वयस्कर याना सुद्धा पावसाळा अस्वस्थ करतो. आपले लग्न झाले,चारचौघांसारखी मुले झाली म्हणून आपण लौकिकार्थाने सुखी झालो. पण आपण त्या पावसाळ्यात ,मैत्रिणीचा हात हातात घेऊन तिला " आय लव्ह यु " म्हणायला हवे होते. घरी महाभारत झाले असते, प्रेमाचे सैराट झाले असते. ब्यू व्हेल सारखा तो प्रेम प्रकरणाचा खेळ जीवाशी खेळ होऊन,प्रकरण अंगाशी येऊ शकत होते. म्हणून आपण माघार घेतली. पण त्या पावसाची आठवण काळजात रुतत राहिली.आपण मनाचा दरवाजा बंद का केला? रस्त्यावर ती एकटीच पावसात भिजत एकाकी गेली, हि व्याकुळता येते, हे चुकलेले निर्णय पावसाळी दिवसात डोळ्यात पाणी उतरवतात.
“ऊगाच आर्त वाटते ते पावसाचे पाणी
प्रश्नांची उत्तरे शोधत मी खोदतो आठवणी.”
दुनिया जिसे कहते है
जादू का खिल्लोना है
मिल जाये तो मिट्टी है
खो जाये तो सोना है
म्हणून पाऊस आला कि आपण ओरडतो
“रेन रेन गो तो स्पेन
नेव्हर शो युअर फेस अगेन “
आणि पाऊस आला नाही तर “तेरे बिना जिया जाये ना”, सांगणारा औदुंबर दिसत राहतो.उनाड शब्द, पावसावर बरसतात. पण हेच खरे कि.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
असे आ
rains r not back